Sunday, February 16, 2025

हसन तडवी यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी निवड

रत्नागिरी : हसन तडवी यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख  पदी निवड  करण्यात आली आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत हसन तडवी यांची महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केल्याची  घोषणा  सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करू या.नवीन नवीन उपक्रम राबवूया.अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी यांनी व्यक्त केली.

हसन तडवी यांची बिरसा फायटर्सच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles