Tuesday, November 12, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत, इंडिया आघाडीला मोठा झटका

मोठी बातमी : हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत, इंडिया आघाडीला मोठा झटका

Haryana Election 2024 : हरियाणा निवडणूकीचे निकाल इंडिया आघाडीसाठी धक्कादायक आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हे निकाल आश्चर्यकारक आहेत. निवडणूक कलांमध्ये अत्यंत महत्वाचे आकडे समोर आले आहेत. भाजपसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरियाणात ब्रँड ठरले आहेत. तर राहुल गांधी यांना मात्र काँग्रेससाठी कोणताही करिश्मा घडवून आणता आलेला नाही. हरियाणा निवडणुकीत मोदींनी ५ निवडणूक रॅली केल्या होत्या.

हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपला ४८ जागा मिळाल्या तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. इंडियन नेशनल लोकदल २ तर अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाचा काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

राहुल गांधींना पण विजयाची मोठी अपेक्षा होती. लोकसभा निवडणुकीतील तेच तेच मुद्दे विधान सभेच्या प्रचारात काँग्रेसला उपयोगी ठरलेले नाहीत. काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण गटबाजी मानले जात आहे. कुमारी शैलजा यांची नाराजी आणि अशोक तंवर यांचे पुनरागमनही काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करू शकली नाही. (Haryana Election)

२०१९ पेक्षाही अधिक जागा तिसऱ्यांदा भाजपने जिंकल्या आहेत आणि स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दोन टर्म सत्ता उपभोगल्यानंतर तिसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळणार नाही, असे वाटत असताना आधीपेक्षाही मोठा विजय भाजपाने प्राप्त केला आहे. हरियानात काँग्रेसचा पक्षातंर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला आहे.

आम आदमी पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवून त्यांचा एकही उमेदवार निवडणुकीत दखल घ्यावी अशी मते मिळवली नाहीत.

Haryana Election

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाटचा ऐतिहासिक विजय, भाजपचा पराभव

गरबा खेळताना प्रसिद्ध कलाकार अशोक माळी यांचा मृत्यू

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी मोठी भरती

Bank Bharti : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत 88 पदांची नवीन भरती

संबंधित लेख

लोकप्रिय