Thursday, February 20, 2025

कष्टकरी कामगारांनी लसीकरण करून घ्यावे, कामगारांसाठी स्पेशल ड्राइव्ह घ्या – काशिनाथ नखाते

पिंपरी : पिंपरी चिंचवड या कामगार नगरीमध्ये बहुतांश म्हणजे तिन लाख कामगारांचे, कष्टकऱ्यांचे लसीकरण झालेले नसून यासाठी कामगार नाके, वस्त्या, वसाहती त्याचबरोबर कामगारांच्या छोट्या-छोट्या कंपन्या आणि सोसायटीगेट वर कामगारांसाठी स्पेशल ड्राइव्ह घेऊन लसीकरण करण्याची गरज असल्याचे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांमध्ये लसीकरणा बाबत अजूनही भिती, शंका आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणच्या कामगारांशी संवाद साधण्यात आला.

कोरोना विरूद्ध लढाईत लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे, त्यामुळे लसीकरण आवर्जुंन  करून घ्या असे आवाहन करण्यात आले.  यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, दिनेश कदम, इरफान चौधरी, महादेव गायकवाड, बिलाल शेख, अनिल माने, सालिम दांगे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी लसीकरण सुरु आहे. यात सोळा लाख लसीकरण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी गरजू कष्टकरी कामगारांमध्ये अजूनही लसीकरण झालेले नसल्याचे नखाते म्हणाले. कामगारांमध्ये शंका-कुशंका, भिती आहे. अनेकांना लस घेतल्यानंतरही कोरोना  झालेला आहे. त्यामुळे कामगार संभ्रमात आहेत तो दूर करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचेही नखाते म्हणाले.

भारत देशामध्ये ८० कोटी लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला आहे तर ५० कोटी लोकांना दोन्ही डोस मिळाले असल्याचे निदर्शनास येत आहे. जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की कोव्हिशील्ड लसीमुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत झालेले असून ही लस घेतल्यानंतर बूस्टर डोस ची गरज भासणार नाही असे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील  कष्टकरी कामगार, घरेलू कामगार, फेरीवाला, कंत्राटी कामगार, छोट्या-छोट्या वर्कशॉपमध्ये काम करणारे कामगार यांच्यासाठी त्या त्या ठिकाणी स्पेशल ड्राइव्ह घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे. कारण कामगार हाच अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये असे मत काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले. तसे पत्र मनपा आयुक्त यानां दिले आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles