१ कोटी ५८ लाख ४६ हजार शिधापत्रिका धारकांच्या पदरी निराशा
पिंपरी चिंचवडमध्ये फक्त १३ % वाटप
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१३ – महाराष्ट्र सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा ” देण्याची घोषणा शिंदे – फडणवीस सरकारने केली, मात्र नियोजन फसले सवंग प्रसिध्दी मिळवली मात्र गोरगरिबांना,कष्टकऱ्यांना शिधा मिळालाच नाही , सरकारने १ कोटी ५८ लाख रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली आणि त्यांचा पाडवा दुःखात गेला आता उद्या बाबासाहेब यांची जयंती आहे तरीही शिधा मिळाला नाही या फसव्या सरकारचा निषेध करतो अशी टिका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
आनंदाचा शिधा अजूनही मिळालाच नाही यावर शिधापत्रिका तीव्र धारकांनी नाराजी व्यक्त केली याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रधारकांना गुढीपाडव्यापर्यंत हे शिधा मिळालाच नाही त्यावेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत सर्वांना शिधा पोहोचेल असे त्वरित सांगितले मात्र हि योजना फसली आहे .यात सिंधुदुर्ग फक्त १२२,रायगड ६०७७, रत्नागिरी ५४५०, पुणे १४३६३ तर पिंपरी चिंचवडला केवळ १३ % पिशव्या वितरण करण्यात आल्या इतकी निराशाजनक स्थिती केली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच्यासुद्धा भर दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा देन्याची घोषणा केली त्याही वेळी किट वरती महोदयांचे फोटो लावायचे म्हणून त्यास उशीर झाला आणि आताही गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ, १ लिटर पाम तेलचे किट १०० रुपयांमध्ये देण्याची सवंग घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात मात्र धान्याचे किट द्यायचं नाही असे सरकारचे धोरण आहे . शहरातील साधारण १ लाख १५ हजार रेशन कार्डधारक या मागणीसाठी वारंवार रेशन कार्ड दुकानदाराकडे जात आहेत त्यातील केवळ १३ % पिशव्या मिळाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. निराशापोटी त्यांना परत यावे लागते हे अत्यंत चुकीचे असून घोषणा केली तर प्रत्यक्षामध्ये आणली पाहिजे. निर्णय वेगवान सरकार गतिमान यालाच म्हणावे का असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे .
“आनंदाचा शिधा” योजना फसली – काशिनाथ नखाते
- Advertisement -