Monday, July 15, 2024
Homeबॉलिवूडधक्कादायक ! अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून काढले अर्धनग्न फोटो, व्हायरल...

धक्कादायक ! अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून काढले अर्धनग्न फोटो, व्हायरल करायची दिली धमकी

मुंबई : मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या एका बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आपण कास्टिंग डायरेक्टर आहोत असं सांगून फसवणाऱ्या एका 24 वर्षांच्या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

या भामट्याने या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे लुटत होता. 

हेही वाचा ! 29 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन राजस्थानमधील प्रतापगडात

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनंजय लिगाडे यांनी म्हटले आहे की, “चित्रपटातील भूमिकेच्या बदल्यात अभिनेत्रीकडून लैंगिक सोयीची मागणी केल्याप्रकरणी टिटवाळा परिसरातून एका कथित कास्टिंग काउच संचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याने अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.”

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश तिवारी ( वय 24 ) असं या तरुणाचं नाव आहे. मालाड सायबर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. या भामट्याने फेसबुकवर आपण कास्टिंग डायरेक्टर आहे असं सांगत होता.

आरोपी, तरुणींना तो वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून त्यांचे फोटोशूट करायचा. त्यानंतर त्यांचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचा. या आरोपीने आपण नेटफ्लिक्स प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे असंही सांगत होता.

हेही वाचा ! भंडारा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदांच्या ११५ जागा

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

हेही वाचा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय