Saturday, April 20, 2024
HomeNewsसंस्कार प्रतिष्ठाणचा हळदी-कुंकू समारंभ आदिवासी पाड्यांवर

संस्कार प्रतिष्ठाणचा हळदी-कुंकू समारंभ आदिवासी पाड्यांवर

मावळ/क्रांतिकुमार कडुलकर :संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मकरसंक्रांती निमित्ताने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील आदिवासी पाड्यांवर केले जाते.

यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील राऊतवाडी या गावातील कातकरी या जमातीच्या आदिवासी पाड्यावर हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.आदिवासी पाड्यावर सुरेख रांगोळी काढली होती.जवळजवळ ६० आदिवासी महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.तिळगुळ घ्या गोड गोड बोला आपण नुसते म्हणतो प्रत्यक्ष कृती कमी होते.

यामध्ये विटभट्टी कामगार महिला,बिगारी,अंग मेहेनती महिला,मजूर महिला अशा एकूण ६० महिला सहभागी झाल्या होत्या.या महिलांनी हळदी -कुंकू समारंभ पार पाडला.वाण म्हणुन प्रत्येक आदिवासी महिलेला एक साडी व एक किलो साखर देण्यात आली हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६ या वेळेत झाला.

याचे प्रास्तविक संस्थेच्या उपाध्यक्षा नम्रता बांदल यांनी केले.हा कार्यक्रम घेण्याचे उदिष्ट सांगितले किमान या निमित्ताने तरी आपल्या महिला एकत्र येतात त्यामुळे एकमेकांची सुखदुखे वाटून घेतली जातात प्रत्येक घरात महिला हि समर्थपणे स्वतः च घर चालवते.एकमेकांशी सौजन्याने वागा.असे बांदल यांनी उद्देशुन सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योगनगरचे केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे होते.याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड संचालिका सुनंदा निक्रड आणिसंस्थेचे खजिनदार मनोहर कड ,मावळ वार्ताचे पत्रकार रामदास वाडेकर,वर्षा कुलकर्णी ,संध्या स्वामी,अलका कुसळ,योगिता जगताप,महेंद्र जगताप,मंगल फरांदे,सुनिता गायकवाड,कीर्ती लोंढे,रुपाली शिंदे,दिपाली शिंदे,अर्पिता आजगावकर,शब्बीर शेख,रोहिणी बच्छाव,देवयानी,कुलकर्णी ,राजश्री शुक्ले,अश्विनी दहितुळे,उमेश गुर्जर.शशिकला गुर्जर,जयवंत सूर्यवंशी,मोहिनी सूर्यवंशी,कदम मॅडम,प्रदिप बांदल,जयवंत सुर्यवंशी,मोहिनी सुर्यवंशी,सत्वशिला जगदाळे यांनी केले होते.या कार्यक्रमाला जाण्यायेण्यासाठी अनिल जगदाळे यांनी स्वतः ची गाडी देऊन मदत केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय