राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत असल्याचे दिसत आहे .काही ठिकाणी राज्यात अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान होऊन द्राक्ष उत्पादकांना देखील याचा फटका बसल्याचे चित्र समोर दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
काही भागांमध्ये एवढी गारपीट झाली आहे की संपूर्ण गाव हे बर्फाच्छादित झाले आहे. बर्फाची पांढरी चादर पसरल्याचे ठिकाणी दिसून येत आहे.एकीकडे कडक उन्हाळा असताना दुसरीकडे मात्र गारपीट पाहायला मिळत आहे .येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र नंदुरबार धुळे आणि कोकण किनारपट्टीवर ती हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे.