संस्कार केले तर संस्कृती टिकेल,संस्कृती टिकली तर राष्ट्रधर्म टिकेल,आई वडील हेच आपले देव आहेत.
आधुनिक युगातील लोक खूप शिकलेले आहेत,मात्र आई वडील वृद्धाश्रमात आहेत
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांचे हितगुज व मार्गदर्शनपर प्रवचन चिखली प्राधिकरण ,पेठ क्र.16,राजे शिवाजीनगर येथील स्वामी सेवा समर्थ केंद्राचे वतीने संत सावता माळी उद्यान येथे ‘भव्य सत्संग मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात हजारो भाविक उपस्थित होते.
यावेळी गुरुमाऊली चंद्रकांतदादा साहेब मोरे यांचे हितगुज प्रवचन आयोजित करण्यात आले होते.ते म्हणाले की,बालसंस्कार ही काळाची गरज आहे. मरते वेळी मुले जवळ नसतील तर आपल्या जीवनाचा काय उपयोग आहे. आज लोक खूप शिकलेले आहेत.डॉक्टर, शिक्षक,एनआरआय, प्राध्यापक व उच्च पदावर नोकरी करत आहेत.आई वडील आज वृद्धाश्रमात आहेत.परंतू कष्ट करणारा शेतकरी संस्कारी असल्यामुळे त्यांचे आई-वडील तुम्हाला वृध्दाश्रमात दिसत नाहीत. त्यामुळे मुलांना कष्ट करण्याबरोबरच संस्कारी बनविण्यासाठी अध्यात्मिक बनवा.संस्कृती,नीतिमूल्ये,राष्ट्रधर्म व राष्ट्र टिकवण्यासाठी स्वामी सेवा मार्गाचे आचरण करा.
सामाजिक जीवनातील समस्यांचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की,उठ सूट पत्रिका बघून जीवनातील समस्या सुटणार नाहीत.आई वडिलांची जिवंतपणी सेवा करा.स्वामी सेवेचा खरा अर्थ जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे,एखाद्याच्या मदतीला धावून जाणे,दुःखीतांना मदत करणे हे आहे.समाजातील समृद्ध वर्गाने पाण्याच्या प्रवाहासारखे परोपकारी असले पाहिजे.पाण्याचा प्रवाह वाहत राहिला तर पाणी स्वच्छ राहते व दुसऱ्याला उपयोगी पडून इतरांची तहान भागवते,पण तेच पाणी खड्डयात साचून राहिले तर शेवाळ चढून अस्वच्छ होते,इतरांच्या उपयोगी पडत नाही.सायंकाळी 5 वा सांस्कृतिक प्रबोधन मिरवणुकी द्वारे संत सावतामाळी उद्यानात गुरुमाऊली चंद्रकांतदादा साहेब मोरे यांचे स्वागत करताना माजी महापौर राहुल जाधव यांनी चिखलीतील संत परंपरेचा उल्लेख केला.ते म्हणाले
जगद्गुरू संत तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर माऊली यांच्या संत परंपरेचा मोठा वारसा या शहराला आहे.चिखली प्राधिकरण व परिसरात धार्मिक,अध्यात्मिक नागरिकांना प्रथमच आध्यात्मिक,सांस्कृतिक प्रवचनाचा लाभ स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने मिळत आहे.याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.आम्ही सर्वजण आज स्वामी कृपेमुळे सुखी आहोत.आम्ही आपल्या सांस्कृतिक अध्यात्मिक सेवा केंद्राचे मनापासून ऋणी आहोत.असे राहुल जाधव म्हणाले.
मोठया संख्येने उपस्थित जनसमुदाय असलेल्या या सत्संगाचा लाभ शहरातील मान्यवरांनी घेतला.कविताताई आल्हाट,दत्तात्रय जगताप,रवी जांभुळकर,प्रताप भांबे,सुप्रियाताई चांदगुडे,मंगलताई जाधव,सुनील दांगडे,बापू आदक,निखिल बोऱ्हाडे,गणेश बोऱ्हाडे,विष्णू पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक स्वामी समर्थ सेवा केंद्र पुणे,संचालक सतीश मोटे,अशोक जाधव,सचिन थोरवे,सचिन बिरले संयोजक रामेश्वर निकम,विश्वनाथ पवार,महेश पोळ,देविदास भोंग,बंडूजमदाडे,संजय हजारे,संतोष खिरे,संजय महामार्गे,लकीचंद गुजर,शिवाजी केदारी,कुलदीप राठोड,गोरक्षनाथ काकडे,शिवाजी साधुले व सर्व सेवेकरी महिला पुरुष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
चिखली प्राधिकरण येथे गुरुमाऊली चंद्रकांतदादा साहेब मोरे यांचे प्रबोधन
- Advertisement -