Saturday, October 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविशेष लेख : गन लॉबी समोर अमेरिकी अध्यक्ष हतबल ?

विशेष लेख : गन लॉबी समोर अमेरिकी अध्यक्ष हतबल ?

 परवा अमेरिकेत टेक्सास मध्ये प्राथमिक शाळेत 18 वर्षीय माथेफिरू गोऱ्या अतिरेकी विचारसरणीच्या मुलाने शाळेत घुसून गोळीबार केला या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला. या हिंसेमुळे अमेरिकेत प्रचंड दहशत पसरली असून देशात चार दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

या गोऱ्या माथेफिरूने ला काळ्या लोकांची प्रचंड घृणा होती हे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्ला करण्याआधी स्वतःच्या आजीची त्याने गोळ्या झाडून हत्या केली. तसेच हा हल्ला करण्याच्या आधी त्याने इन्स्टाग्रामला दोन रायफलसह पोस्ट टाकली होती तसेच फेसबुक वर ही हल्ल्याचे चित्रण लाइव्ह केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

यावर बोलताना अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन मीडिया समोर भावुक झाले होते. (आपले तर तेवढेही दुःख व्यक्त करत नाहीत.) परवाच मध्ये प्रदेश मध्ये दिनेश कुशवाह या भाजप आमदाराच्या माथेफिरू नवऱ्याने एका 65 वर्षीय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या वृद्धाची फटके देऊन देऊन हत्या केली. कनेक्टिकट मध्येही पूर्वी शाळेत अश्याच हत्या झाल्या होत्या. पाकिस्तानातील पेशावर मध्येही शाळेत अश्याच सुमारं 50 मुलांच्या हत्या झाल्या. यामागील विचारसरणी व सूत्रधार व या गोऱ्या अतिरेकी मुलाच्या विचारसरणी एकच आहे.

ज्यो बायडेन गन लॉबी समोर हतबल दिसले. गोऱ्यांची दहशत (White Supremacy) चालणार नाही असं ते म्हणाले. तसेच गन लॉबीला रोखण्यासाठी जनतेनेच दबाव आणावा असं ते म्हणत आहेत. असं म्हणणं म्हणजे सरकार नावालाच आहे की काय अमेरिकेत असा प्रश्न पडतं. मग सरकार काय गन लॉबी व झायोनिस्ट लॉबी चालवत आहे काय ? असं म्हणणं म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव रोखण्यासाठी, देशातील बेरोजगारी, महागाई रोखण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत असं एखाद्या देशाच्या प्रमुखांनी म्हणण्यासारखं आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतात जशी विशिष्ट जातीची लॉबी मुख्य सूत्रधार म्हणून पडद्यामागून कटकारस्थान करून काम करत असते अगदी तसाच हा प्रकार आहे. टेक्सासचा रिपब्लिकन (म्हणजेच भारतीय भाजपचा अवतार) गव्हर्नर तरी निर्लज्जपणे म्हणतो की बंदूका खरेदीचे नियम अजून सोपे करू. अमेरिकेत अनेक ठिकाणी सोप्या पद्धतीने अशी गन मिळते व उजव्या विचारसरणीच्या माथेफिरू रिपब्लिकन विचारसरणीचे त्याला समर्थन असते. स्वतः च्या नावात लोकशाही शब्द असूनही आताचे डेमोक्रॅटिक (म्हणजेच भारतातील काँग्रेसचा अवतार) त्याविरुद्ध ठोस कारवाई करत नाहीत हेच दिसून येत आहे.

संपूर्ण जगात आजवर जितका रक्तपात, युद्धे, दहशतवादी कृत्ये झाली आहेत व होत आहेत त्यामागे अमेरिकाच्या याच गन लॉबी व झायोनिस्ट विचारसरणीचा हात असतो. झायोनिस्ट लॉबी यामागील मुख्य सूत्रधार असते. याच उजव्या अतिरेकी विचारसरणीतून 3 वर्षांपूर्वी काही गोऱ्या पोलिसांनी काळ्या व्यक्तीला (जॉर्ज फ्लॉइड) रस्त्यात उलटे झोपवून पकडून त्यातील एकाने मानेवर गुडघा दाबून ठेवल्याने तो विव्हळत होता की “मला श्वास ही घेता येत नाहीये – I can’t breathe” तरी त्या पोलिसाने तो बेशुद्ध झाल्यावरच त्याला सोडले व नंतर त्याचा मृत्यू झाला. या हत्येमुळे अमेरिकेत प्रचंड आंदोलने, हिंसाचार झाला व सर्व जगाने याची निंदा केल्यावर त्या पोलिसावर हत्येचा गुन्हा दाखल झाला व त्याला सेवेतून बडतर्फ केले गेले. आपल्याकडे हे खूपच क्वचित दिसते. डोनाल्ड ट्रम्पला हटवून अमेरिकी जनतेने जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा बदला घेतला. आपण कधी शिकणार ?

राज्यात कोरोना वाढतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले “हे” आवाहन

संपूर्ण जगात ढवळाढवळ करणारी, सरकारे उलटवणाऱ्या अमेरिकेने स्वतः च्या नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, सरकारी मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा इ. कडे लक्ष दिले व तेलाचं राजकारण करून इतरांना लुटणे बंद केले तरी जगात खूप शांतता नांदेल. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाची खरी सूत्रधार ही अमेरिका व नाटो हेच आहेत.

खोट्या महासत्तेचा अध्यक्ष इतका हतबल मीडिया समोर दिसला यावरून अमेरिकी व इतर जगातील जनतेने बोध घ्यावा व सरकार + प्रशासन + पोलीस यंत्रणेपासून + गुप्तचर यंत्रणेच्या षडयंत्रापासून सामान्य जनतेचे रक्षण करणे हीच सर्वांत मोठी देशभक्ती ठरेल. अश्या विषमतावादी अमेरिकी व्यवस्थेत पुण्यातील क्षमा सावंत ही महिला तेथील डाव्या समाजवादी पक्षाकडून अनेकदा निवडून आली आहे व काही सकारात्मक बदल घडवत आहे ज्यामागे लोकशाही वादी, शांतता प्रिय अमेरिकी नागरिकांनी उभं राहण्याची गरज आहे व अश्या व्यक्तीला अध्यक्ष पदावर जाण्यासाठी मदत केली पाहिजे.

सचिन गोडांबे

पुणे.

संबंधित लेख

लोकप्रिय