Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : खैरे येथे महिला आणि किशोरवयीन मुलींना "वयात येताना" या विषयावर...

जुन्नर : खैरे येथे महिला आणि किशोरवयीन मुलींना “वयात येताना” या विषयावर मार्गदर्शन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर, ता.५ : लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामीण भागातील खैरे या गावी महिला व किशोरवयीन मुलींना “वयात येताना” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक बदल, योग्य आहार, मासिक पाळी तसेच घ्यावयाची काळजी याबाबत डॉ.प्रिया कर्डिले आणि डॉ.प्रिया जठार यांनी मार्गदर्शन केले.

सर्व विद्यार्थिनी व महीला यांना सॅनिटरी नॅपकीन व मास्कचे वाटप करण्यात आले. प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्षा नंदा शिंदे, सेक्रेटरी भाग्यश्री गोसावी, प्रकल्प समन्वयक प्रीती झगडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी रुपाली मुत्था, वैशाली भालेकर, अंजली जंगम, श्रेया भोर, नीता देसाई तसेच आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील गृहपाल अर्चना पवार हे उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय