सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त भारताचा लोकशाहीवादी युवा संघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी व जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्ल्याळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर पांजारापोळ चौक येथील अश्वारूढ पूर्णाकृती शिवाजी महाराज पुतळा येथे जयघोष करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर, अँड.एम.एच.शेख, अँड.अनिल वासम, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, दीपक निकंबे, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, विजय हरसुरे, दिनेश बडगू, प्रवीण आडम, मोहन कोक्कूल, सनी आमाटी, नागेश म्हेत्रे, किशोर मेहता, बाबू कोकणे, अंबादास गडगी, किशोर गुंडला आदींची उपस्थिती होती.
