Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी येथे संभाजी महाराजांना सर्वपक्षीय संघटनाचे अभिवादन

पिंपरी येथे संभाजी महाराजांना सर्वपक्षीय संघटनाचे अभिवादन

पिंपरी चिंचवड : संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अंकुश कानडी, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी व रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी संभाजी महाराज यांचे मोठे योगदान आहे. तरुणांमध्ये त्यांचे विचार रुजवण्याची आवश्यकता असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

यावेळी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, समाजवादी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रफिक कुरेशी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), वाहतूक आघाडी अध्यक्ष अजिज शेख, अपना वतन संघटनेचे हमीद शेख, वंचित बहुजन आघाडी शहर संघटक सचिन सोनवणे, व्यसन मुक्ती आंदोलनाचे नेते विल्यम साळवी, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे आदी उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय