जुन्नर / आनंद कांबळे : अमरापूर बीटच्या “यशवंतराव कला क्रिडा महोत्सव सन -२०२३/२०२४” बीटस्तरीय स्पर्धा कुलस्वामी खंडेराय हायस्कूल, वडज या ठिकाणी संपन्न झाल्या या बीटस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवाडीचे स्पर्धकांनी सांघिक मध्ये घवघवीत यश संपादन केले.
---Advertisement---
१) लोकनृत्य स्पर्धा – मोठा गट-प्रथम क्रमांक
२) लेझीम – १) मोठा गट मुले-प्रथम क्रमांक, २)मोठा गट-मुली-प्रथम क्रमांक, ३)लहान गट-मुली-प्रथम क्रमांक, ४)लहान गट-मुले-द्वितीय क्रमांक.
---Advertisement---
३) खो खो – लहान गट मुले-द्वितीय क्रमांक
सर्व स्पर्धकांचे, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचे पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती इनामवाडी यानी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांसाठी शुभेच्छा दिल्या.
