पुणे : aborigine संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सांस्कृतिक ऑनलाइन पारंपरिक नृत्य व फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी अनुसूचित जमातीच्या संस्कृती, परंपरा, वेशभूषा, रितिरिवाज यांच्या संरक्षण आणि संवर्धन व प्रचार प्रसारासाठी हे ध्येय साधुन aborigine या समाजिक संस्थेकडून ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
या स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार ५००० रुपये, द्वितीय पुरस्कार ३००० रुपये, तृतीय पुरस्कार २००० रुपये ठेवण्यात आले असून अ गटात वय वर्षे 5 पर्यंत ब गटात ५ ते १७ वर्ष क गटात १८ वर्षावरील अश्या तीन विभागात ठेवण्यात आली आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून आदिवासी लोक सहभागी होत असून इछुक स्पर्धकानी १३ ऑगस्ट २०२० पर्यंत aborigineculturalfest20@gmail.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिकच्या माहितीसाठी सुवर्णा खाडे मो. नं 9325289653 व धनंजय पिचड मो नं 8104875584 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ. निलेश परचाके यांनी दिली.