Friday, March 29, 2024
Homeआरोग्यडॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर राजगुरूनगर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भव्य मोफत आरोग्य शिबिर !

डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर राजगुरूनगर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भव्य मोफत आरोग्य शिबिर !

राजगुरूनगर / रवींद्र कोल्हे : रोटरी क्लब राजगुरूनगर, नारायणगाव हायवे व लोकमान्य हॉस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर पुणे जिल्ह्यात रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या, नारायणगाव येथील डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर च्या पाचव्या शाखेचे उद्घाटन सभारंभ होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून, राजगुरूनगर येथील मार्केट यार्ड समोर पुणे – नाशिक महामार्गावर डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर चे उद्घाटन शुक्रवार दि.२० ऑगस्ट रोजी होत आहे.

लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथील नामांकित डॉक्टर या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. राजगुरूनगर शिवारातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब राजगुरूनगर आणि नारायणगाव हायवे शाखेने केले आहे. 

शिबिरात पॅथॉलॉजी तपासणी हिमोग्राम रक्तगट, अस्तिरोग :: मणक्याचे आजार गुढघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी खांद्याचे विकार, स्त्रीरोग, कर्करोग (स्तनाचा व गर्भाचा), स्रियांच्या सर्व समस्या, नाक, कान, घसा तज्ज्ञ, कान खाजणे, बहिरेपणा, कान वाहणे, ऐकण्याची तपासणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया, अल्पदरात चष्मे (सौजन्य ::समर्थ आय केअर) हृदयरोग तपासणी शिबिरात भाग घेणाऱ्या रुग्णांसाठी डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर,राजगुरूनगर मध्ये सर्व तपासण्यांवर ( डायग्नोस्टिक सेंटर मधील) ५०% सवलत दिली जाणार आहे. 

शिबिराचे ठिकाण कॉन्फरन्स हॉल, २रा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, पुणे नाशिक हायवे, राजगुरूनगर, पुणे,मो.नं.७४१०००८१९९ / ०२१३२– २२३३६६ आहे.

या शिबिराचे निमंत्रक रोटरी क्लब राजगुरूनगरचे प्रेसिडेंट रो.अजित वाळुंज, रो.नारायणगाव शाखेचे रो.शिवाजी टाकळकर, रोटरी क्लब राजगुरूनगर चे सेमक्रेटरी जितेंद्र गुजराथी, नारायणगाव रो.रविंद्र वाजगे, दिलीप बांबळे रो.श्रीकांत फुसुंदर, रो.डॉ.ओंकार काजळे आणि रो.नंदकुमार चिंचकर आदी.मान्यवर आहेत. सकाळी साडे दहा (१०.३० ते सायंकाळी चार (४.००) वाजेपर्यंत राहणार आहेत.

शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर रोटरी क्लबचे प्रांतपाल रो.पंकज शहा आणि राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते होणार आहे. 

यावेळी बी.आर.काळे, देवेंद्र बुट्टे पाटील, प्रताप टाकळकर, देविदास भालेराव, समीर थिगळे, बापू थिगळे, डॉ.महेशकुमार टाकळकर, डॉ.प्रदीप शेवाळे, डॉ.प्रितम तितर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय