उधळे वाकडपाडा : सरपंच लता वारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत उधळे वाकडपाडा ची ग्रामसभा आज घेण्यात आला आली. यावेळी सरपंच लता वारे यांनी गाव विकासासाठी आराखडा करुन पुढील काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, या कडे विशेष लक्ष देऊन, सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे केली जातील असे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच नंदकुमार वाघ, सदस्य सुरेश शिंदे, गणेश खादे, हर्षदा खादे, चंचला सारक्ते, मोहीनी वाघ, सोनाली पाडेकर, ग्रामसेविका मंदा पारधी, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, देवेंद्र कामडी, सखाराम शिद, संजय वाघ, अशोक वाघ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.


