जुन्नर / शिवाजी लोखंडे : माणकेश्वर ता.जुन्नर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत किड व रोग सल्ला सर्वेक्षण (क्रॉपसॅप) अंतर्गत हरभरा शेती शाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली माणकेश्वर येथील सुमारे 30 शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने हरभरा पेरणी केली आहे. यानिमित्ताने आज (१९) किड व रोग सल्ला सर्वेक्षण(क्रॉपसॅप) अंतर्गत हरभरा पिकाची शेती शाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन हरभऱ्याची आधुनिक पद्धतीने पेरणी कशी करावी याचे मार्गदर्शन केले होते.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
संतापजनक : वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला माजी सरपंचाची बेदम मारहाण
तसेच आज हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी, रोग व कीड नियंत्रण कसे करावे त्याच बरोबर हरभरा पिकाची 25 ते 30 दिवसात शेंडा खुडणी केल्याने फुटण्याची संख्या वाढून उत्पादन वाढते तसेच घाटे आळी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करणे व 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी याविषयी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक भारती मडके, अमोल भालेकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच जुन्नरचे तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ यांचेही नेहमी सहकार्य व मार्गदर्शन मिळत असते.
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
यावेळी धर्मा मुक्ताजी कोरडे, बाळू जाणकु कोरडे, एकनाथ मुंढे, धोंडू बांबळे, लक्ष्मण कोरडे, किसन शेळकंदे, जानकु लांडे, रविराज बांबळे, लहाणाबाई कोरडे, लताबाई कोरडे, कमल लांडे आदी शेतकरी उपस्थित होते.