Thursday, March 28, 2024
HomeNewsराज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करावी - काशिनाथ नखाते यांची राष्ट्रपती...

राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करावी – काशिनाथ नखाते यांची राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे मागणी.

पुन्हा अशा राज्यपालाची महाराष्ट्रालात नियुक्ती नको.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:
भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पदाची गरिमा राखण्याचं काम राज्यपालानी करणे गरजेचे असताना राज्यपाल नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी हे महाविकासआघाडी सरकारला थेट आव्हान देण्याचे काम केले, त्याचबरोबर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली यावर महाराष्ट्र राज्यात अनेक मोर्चे,आंदोलने झाली मात्र तरीसुद्धा पदमुक्ती झाली नाही आता राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करून त्यांना उत्तराखंडला पाठवावे व यापुढे महाराष्ट्र राज्यांमध्ये असा राज्यपाल नको अशी मागणी कामगार नेते काशिनाथ खते यांनी केली आहे .

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक राज्यपालांनी येथे येऊन त्यांच्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती जेव्हापासून झाली तेव्हापासून ते नेहमीच वादात राहिलेले आहेत, राज्यपाल यांनी महाविकास आघाडी काळात सरकारच्या कारभारात अवाजवी हस्तक्षेप केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्याकडे तक्रार केली होती. महापुरुषांच्या अवमानाबद्दल विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, व राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली होती. कोरोना काळात मंदिरे बंद का ठेवता सेक्युलर झालात का ? अशाप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा पत्रातून काढला होता. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची महाविकास आघाडीची यादी ही त्यांनी मान्य केली नाही आणि नंतरच्या सरकारची दुसरी यादी त्वरित स्वीकारली याला नायालायाने फटकारले आहे .

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे आदरस्थान असणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले , छत्रपती शिवाजी महाराज च्या थोर महापुरुषांचा अवमान बदनामी वारंवार केलेला आहे. यामुळे सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलने झाली , मोर्चे झाले तरीही त्यांची बदली झालेले नाही, पद मुक्त करण्यात आले नाही. म्हणून राज्यपाल राष्ट्रपुरुषांच्या व महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असणाऱ्या महात्मा फुले, छ.शाहू महाराज,डॉ. आंबेडकरांच्या अवमान होऊन ही पदमुक्त का केले जात नाही ? याला सरकारचा पाठिंबा आहे का अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जनतेला पडलेला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केलेली आहे . महाराष्ट्रासारख्या संत परंपरा, समाज सुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यपाल होण्याचा बहुमान माझ्याकरिता अहोभाग्य होते असा पत्रात उल्लेख राज्यपालांनी केलेला असला तरी या तीन वर्षांमध्ये त्यांनी वारंवार बहुजन महापुरुषांचा, अवमानच केला आहे.

पदमुक्त ही त्यांची मागणी तातडीने मान्य करून त्यांना पदमुक्त करावे. भविष्यातील महाराष्ट्र राज्यासाठी नेमण्यात येणारा राज्यपाल हा अशा प्रकारचे महाराष्ट्र द्रोही आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील आम जनतेची मने न दुखणारा, तसेच महापुरुषांचे अवमान न करणारा राज्यपाल यांची नियुक्ती करावी.आणि भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ पदमुक्त करावे अशी मागणी नखाते यांनी केली आहे .

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय