नागपूर : पीक विमा संदर्भात सरकारने हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथे केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा या भेटीत त्यांनी दिला आहे.
रंगा राचुरे म्हणाले की, मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यावरची भरपाई रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मोबाईल व इतर ऑनलाइन तांत्रिक बाबी वापरणे सामान्य शेतकऱ्याला शक्य झाले नाही याचा गैरफायदा घेत ही भरपाई टाळण्याचा प्रयत्न विमा कंपन्या करीत आहेत व सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
तसेच मागील वर्षीचा लॉकडाउन चा आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पेरणीच्या काळात असलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलत विमा कंपन्यांना नुकसानभरपाई रक्कम देणे भाग पाडावे, अशी मागणी केली आहे.