गणवेश स्वातंत्र्याचे विद्यार्थिनींकडून जल्लोषात स्वागत !
केरळ : केरळ नेहमीच देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले आहे. शिक्षण आणि आरोग्यासोबतच सामाजिक बदलासाठी केरळ केरळमधील सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित डावी आघाडी पावले टाकत आहे. केरळमध्ये मुलामुलींसाठी समान गणवेश लागू करून स्री – पुरुष समानतेकडे एक टाकले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
‘बीबीसी’ शी बोलताना बालूसरी येथील श्रिंकी सीके म्हणते, “युनिसेक्स गणवेश म्हणजे मुलामुलींसाठी एकच गणवेश लागू करणारी आमची पहिली सरकारी शाळा आहे. मला एखाद्या क्रांतीचं – मोठ्या बदलाचा भाग असल्यासारखं वाटतं आहे,” असं श्रिंगीने सांगितले.
कोझिकोडमधील बालूसेरी गावातील मुलींच्या उच्च माध्यमिक सरकारी शाळेत विद्यार्थ्याप्रमाणे गणवेश घालण्यास विद्यार्थिनींना परवानगी दिली. अशा प्रकारे मुलींना जास्त स्वातंत्र्य दिले जात असल्याचा दावा करीत काही कट्टर मुस्लिम संघटनांनी शाळेबाहेर आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. पण गणवेश स्वातंत्र्याबद्दल विद्यार्थिनींनी जल्लोष करून आनंद व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
केरळ सरकारच्या अनुकूल धोरणामुळेच या सरकारी शाळेला मुलींच्या गणवेशासंदर्भात असा निर्णय घेता आला.
“गणवेश आणि शालेय पध्दती ही काळानुरूप बदलायला हवी”, असे केरळचे शिक्षणमंत्री व्ही. सिवानकुट्टी यांनी सांगितलं.
केरळ राज्यात दिनांक १५ डिसेंबर २०२१ पासून शाळेत समान गणवेशाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी या योजनेचे उद्घाटन केले.
■ लिंगभाव समांता हे नव्या गणवेशामागचं उद्दिष्ट
“जन्म झाल्यापासून मुलगा – मुलगी असा भेद केला जातै. मुलांना बंदुका, गाड्या आणि चेंडू तर मुलींना बाहुल्या, संसाराची भांडी खेळणी म्हणून दिल्या जातात. जसेजसे वय वाढतं, तसं कपडे आणि शूज बदलत जातात.