Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

केरळ सरकारने स्वतःचे K-FON इंटरनेट सुरू केले

तिरुअनंतपुरम / जलील बाबू : केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (K-FON)) द्वारे राज्य सरकारने राज्यसरकारच्या मालकीची इंटरनेट सेवा करून ‘माध्यम क्रांती’ ला व्यावहारिक व लाभदायी उपक्रम सुरू केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रणित डाव्या आघाडीच्या केरळ सरकारचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी या प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे उदघाटन केले.

याप्रसंगी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी सांगितले की, इंटरनेट ही आजच्या काळातील मूलभूत सेवा आहे. दारिद्र्यरेषेखालील 20 लाख कुटुंबाना मोफत इंटरनेट सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत सुलभपणे व मोफत दिली जाणार आहे. (BPL) कुटुंबे आणि 30,000 सरकारी संस्था सह केरळच्या जनतेला नाममात्र दारात केरळ सरकार ऑनलाईन सेवा सुरू केली आहे.जगात सर्वाधिक इंटरनेट बंद होण्याचे प्रमाण भारतात आहे. गेल्या दहा वर्षांत भारतात 700 हून अधिक इंटरनेट बंद झाले आहेत.

---Advertisement---



अशा देशात केरळ सरकार सर्वांसाठी इंटरनेट उपलब्ध असल्याची खात्री करत आहे. K-FON प्रकल्प डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारच्या आणि आमच्या राज्याच्या पर्यायी धोरणांचे आणखी एक उदाहरण बनत आहे. बदलत्या जगाशी सुसंगत राहण्यासाठी सार्वत्रिक इंटरनेटचा वापर आवश्यक आहे. याद्वारे आम्ही संपूर्ण केरळला जागतिक माहिती तंत्रज्ञानाशी जोडत आहोत, असे पिनरई विजयन म्हणाले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles