Thursday, August 11, 2022
Homeजिल्हाश्री.नृसिंह जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी - प्रा.गंगाधर चेपूरवार

श्री.नृसिंह जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी – प्रा.गंगाधर चेपूरवार

spot_imgspot_imgspot_imgspot_img

हिंगोली : दासरी माला दासरी समाजाचे आराध्य कुलदैवत असलेल्या भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जयंती निमित्त २५ मे २०२१ वार मंगळवार रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, व दासरी समाज बांधवाना शासकीय मदत, विविध शासकीय योजनाचा लाभ तत्काळ मिळावा अशा विविध मागण्यांसाठीचे निवेदन (ता. १८) दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर चेपूरवार यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीत ४० व्या क्रमांकावर असलेल्या दासरी माला दासरी समाजाचे आराध्य कुलदैवत भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी असुन, २५ मे २०२१ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी सदर निवेदनात करण्यात आली असून, यासह कोरोना काळात लॉकडाउनमुळे दासरी माला दासरी समाजाचा पारंपारिक व्यवसाय कुंकू, हळदी, दाशिना, कटलरी गृहोपयोगी सामान विकणे बंद झाले असून, खेडी, वाडी, वस्ती, गांव, जत्रा, बाजार फिरून पोटाची खळगी भरणारा हा दासरी समाज सद्य परिस्थितीत हालाखित जगत असुन समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात दासरी माला दासरी समाज उपेक्षित व वंचिताच जीवन जगत आहे, दासरी माला दासरी समाज महाराष्ट्र राज्यात हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात दासरी समाज तुरळक प्रमाणात आढळून येतो, दासरी माला दासरी समाजाच्या व्यथा अनेक असून, दासरी माला दासरी समाज बांधवाना या लॉकडाउनच्या कठीण काळात मदत म्हणून, त्यासाठी शासनाने तत्काळ शासकीय मदत करून विविध शासकीय योजनाचा लाभ दासरी माला दासरी समाजाला मिळवून द्यावा ह्या प्रमुख मागणीसाठी दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर चेपूरवार ह्यांनी पुढाकार घेऊन निवेदन दिले आहे.

पिढ्या न पिढ्या पासुन शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रात उपेक्षित व वंचित असलेल्या दासरी माला दासरी समाजाला शासन दरबारी आगामी काळात सामाजिक न्याय हक्क मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रा. गंगाधर चेपूरवार यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी सोशल डिस्टनसिंगचे व शासकीय नियमांचे पालन करत समाज बांधवाच्या वतीने प्रा.गंगाधर चेपूरवार यांनी जिल्हाधिकारी हिंगोली येथे सदर मागण्यांसाठीचे निवेदन दिले असून, निवेदनावर प्रा.गंगाधर चेपूरवार, अश्विनी अलडवार-चेपूरवार, पवन सादुलवार सह आदि दासरी समाज बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय