Saturday, April 1, 2023
Homeशहरआळंदीत समाजसेवक अण्णा हजारे यांची सद्दिच्छा भेट

आळंदीत समाजसेवक अण्णा हजारे यांची सद्दिच्छा भेट

आळंदी (अर्जुन मेदनकर) : जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सद्दिच्छा भेट देऊन दर्शन घेत श्रींचे वैभवी चांदीचे पादुकांची पूजा केली. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती आनंद जोशी यांनी केले. आळंदी देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ, ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.

या सद्दिच्छा भेट प्रसंगी त्यांचे समवेत वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, नरहरी महाराज चौधरी, राजाभाऊ रंधवे चोपदार, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संघटक पै. बाळासाहेब चौधरी, आळंदी समिती शहर अध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील, बाळकृष्ण मोरे, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, संकेत वाघमारे, विलास वाघमारे, माजी नगरसेवक सागर भोसले, संस्थेचे व्यवस्थापक तुकाराम मुळीक यांचेसह वारकरी शिक्षण संस्थेचे साधक, भाविक उपस्थित होते.

आळंदीत समाजसेवक अण्णा हजारे यांनी वारकरी शिक्षण संस्थेस भेट दिली. येथे वारकरी शिक्षण घेणाऱ्या चौथ्या वर्षातील साधक विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संतांचे विचार आदर्श जीवनासाठी प्रेरणा देतात. माऊलींचे ज्ञानेश्वरी तील एका ओवीवर काम केले. यातून राळेगणसिद्धी आदर्शगाव ठरले. आता लाखो लोक याठिकाणी पाहणी करण्यास येतात. अनेकांनी येथील विकास कामांची माहिती घेत अभ्यासकरून पी.एच डी. देखील केल्या आहेत. जीवनात आचार शुद्ध, विचार शुद्ध, चारित्र्य निर्मळ आणि त्याग महत्वाचा असल्याचे सांगितले. आपण येथे शिक्षणासाठी चार वर्ष घरापासून दूर राहत आहेत. हाही एक त्यागच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा जीवन प्रवास उलगडून सांगितले. आळंदीसह इतर ठिकाणी केलेली आंदोलने यातून सरकार आणि शासनास धोरणात्मक निर्णय घेऊन कायदे करावे लागले. यातून माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा, लोकायुक्त कायदा, बदल्याचा कायदा आदी कायदे होण्यास भाग पडले. हे सर्व जनतेच्या आंदोलनाचे यश असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करीत युवक तरुणांनी देश घडविण्यासाठी आपापल्या परिसरातून गावांतून सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले ज्या प्रमाणे एखाद्या दाण्याने जमिनीत गाडून घेतले तरच पुढे हजारो दाणे तयार होतात. त्या प्रमाणे स्वत:पासून सुरुवात करून देश घडविण्याचे कार्यात सर्व तरुणांनी भाग घ्यावा. वारकरी साधक, विद्यार्थी यांनी देश विकासाच्या कार्यात यापुढील काळात सहभागी व्हावे असे आवाहन समाजसेवक हजारे यांनी आळंदीत वारकरी साधकांना मार्गदर्शन करताना केले.

वयाच्या ८६ व्या वर्षी देखील युवक तरुणांना लाजवेल असे प्रखर प्रभावी विचार यावेळी त्यांनी मांडले. माऊली मंदिर ते वारकरी शिक्षण संस्था ते भराव रस्ता असे पायी चालत त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने मारुती महाराज कुरेकर यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचा सत्कार केला. दरम्यान रस्त्याचे दुतर्फ़ा नागरिकांनी संवाद साधला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संघटक पै. बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा माऊलींची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय