मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत असल्यामुळे राज्यातील सर्व निर्बध 1 एप्रिलपासून उठवले जाणार आहेत.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी, करोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेणार असल्याचे सांगितले. राज्यात 1 एप्रिलपासून करोना निर्बंध मुक्ती होणार आहे. त्यामुळे जनतेवर लावण्यात आलेले निर्बंध देखील हटणार आहेत. मात्र, या काळात लोकांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भर दिवसा हल्ला
राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू राहील. रेल्वे प्रवासासाठी किंवा मॉल प्रवेशासाठी पूर्णतः लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे असेल.
तर चीन व अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मास्क व सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येणार आहे.
महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल 115 पार, तर डिझेलची शंभरी पार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती