Thursday, July 18, 2024
Homeआरोग्यमहिलांसाठी खूशखबर : राज्य सरकार देणार १ रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन

महिलांसाठी खूशखबर : राज्य सरकार देणार १ रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन

कोल्हापूर : मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त समाजात जनजागृती व्हावी यासाठी आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाई कमी मुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने देखिल महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी नाममात्र रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राज्य सरकार राबविणार आहे. ही नवीन योजना ग्रामविकास खात्याकडून राबवण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार १ रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने याचा फायदा राज्यातील ६० लाख महिलांना होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

विशेष लेख : मासिक पाळी – अपवित्र आहे ? चला तर समजून घेऊ

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन बँक मध्ये 312 रिक्त पदांसाठी भरती, 36000 ते 76000 रूपये पगाराची नोकरी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय