Friday, April 26, 2024
Homeराज्यप्राध्यापकांसाठी खुशखबर ! 'या' महाविद्यालयातील पदे भरणार, राज्य सरकारचा निर्णय !

प्राध्यापकांसाठी खुशखबर ! ‘या’ महाविद्यालयातील पदे भरणार, राज्य सरकारचा निर्णय !

पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार !

 

मुंबई : सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून 9 अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक रुपये १ कोटी ७५ लाख १० हजार ६५२ खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.

हेही वाचा ! ब्रेकिंग : सर्वच दुकानांच्या नामफलकाबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

हेही वाचा ! पुणे : उद्यापासून किसान सभेचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन


हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय