Jio recharge plan : टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत किफायतशीर योजना जाहीर केली आहे. Jio च्या 479 रुपयांच्या या नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सह अनेक आकर्षक फायदे मिळणार आहेत. हा प्लॅन बजेट अनुकूल असून सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात मोबाईलचा वापर करत असताना आपण इंटरनेटचा वापर जास्त करतो त्यासाठी आपण अमर्यादित आणि हायस्पीड इंटरनेटसाठी वायफाय बसवतो. या सोबतच आपण महागडे रिचार्ज देखील करतो. त्यामुळे आपण केलेल्या मोबाईल रीचार्ज मधील दैनंदिन डेटा देखील वापरत नाही, अशा परिस्थितीत आपण विनाकारण अधिकचा पैसा खर्च करतो. त्यांच्यासाठी जिओने एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन केवळ 479 रूपयांचा आहे. याची वैधता 84 दिवसांची आहे.
काय आहे Jio Recharge plan प्लॅनचे फायदे
जिओ ने एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन 479 रूपयांचा असून याला 84 दिवसांची वैधता आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा असणार आहे. या प्लॅन मध्ये एकुण 1000 SMS देण्यात आले आहे. मात्र डेटा मर्यादेत घट करून ती एकुण 6 GB ठेवण्यात आली आहे. या प्लॅन चा उपयोग ज्यांच्या घरी वायफाय आहे, किंवा जे इंटरनेट चा जास्त वापर करत नाही, त्यांच्या साठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.
या प्लॅनमध्ये अतिरिक्त सुविधांचा देखील समावेश आहे. त्यानुसार आपल्याला JioCinema, JioTV, JioCloud यांसारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला JioCinema च्या माध्यमातून चित्रपट, वेबसीरीज, आणि लाईव्ह टीव्हीचा आस्वाद घेता येणार आहे.
Jio च्या 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि प्रचंड फायदे किफायतशीर किमतीत दिले जात आहेत. विशेषतः 84 दिवसांच्या दीर्घ वैधतेमुळे हा प्लॅन बाजारातील इतर योजनांच्या तुलनेत अधिक लाभदायक ठरणार आहे.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !