मिरज/क्रांतिकुमार कडुलकर:व्हॅलेंटाईन डे निमित्त राष्ट्र सेवा दल,छात्र भारती व इन्कलाब युथ फौंडेशन मिरज आयोजित ‘इश्क -ए -आझाद’ हा कार्यक्रम मिरज मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन मिरज येथे घेण्यात आला. यात विविध संस्था संघटना मधील सहभागी सदस्यांनी प्रेमावरील सत्य परिस्थितीवर आधारित शायऱ्या, कविता,गझल इत्यादी बोलून आपले मत व्यक्त केले. तसेच प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे हा फक्त प्रेमिका प्रेमी मधेच संकुचित न ठेवता, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर , प्राण्यांच्या वर, देशावर, आपल्या समाजावर प्रेम करता आल पाहिजे.
साने गुरुजी म्हणतात तसे खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे विचार सर्वांच्या बोलण्यातून पुढे आले. प्रेम हा कोणताही जात, धर्म न पाहता मनुष्याच्या सर्व नात्यामध्ये असतो, आणि तो जपला पाहिजे आणि हाच मानवातावादी दृष्टकोन ठेऊन आपण एकत्र आले पाहिजे. प्रेमामध्ये बंधन नसते ते स्वतंत्र आणि सर्वत्र असते.असे मत जमलेल्या सर्व तरुणाईने व्यक्त केले.
या कार्यक्रमात जहिर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.
हाजी जेलाब काझी- शायर यांनी सर्वधर्मीय एकतेचे महत्व आपल्या गझल व शायरी मधून सांगून सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी बऱ्याच तरुणांनी आपल्या आपल्या रचलेल्या कविता, चारोळ्या शायऱ्या सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाहिस्ता, रोहित, ऐश्वर्या यांनी समतेचे गीत गाऊन कार्यक्रमाचा शेवट केला तसेच मा परशुराम कुंडले सर यांच्याकडून सर्वाना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी राष्ट्र सेवा दलचे राष्ट्रीय संघटक मा सदाशिव मगदूम सर, इन्कलाब युथ फौंडेशन चे रोहित शिंदे, युवक क्रांती दलचे युवराज मगदूम,छात्र भारती संघटनेचे प्रसाद पवार, हेरंब माळी, राज कांबळे, आकाश सूनके, शहिस्ता मुल्ला, ऐश्वर्या माने, राहत सतारमेकर, प्रार्थना कदम, अक्षय पवार, प्रकाश पवार, अभिजित जाधव, मिरज शहर सुधार समितीचे मा जहीर मुजावर सर,मा हाजी जेलाब काझी शायर, राष्ट्र सेवा दलचे कार्यकारिणी सदस्य मा परशुराम कुंडले सर,आरोग्य ग्राम संस्थेचे डॉ सुनिल माने व त्यांचे सहकारी,निसर्ग सवांद संस्थेचे मा राजेंद्र जोशी सर व नंदकुमार यादव सर तसेच दैनिक सकाळचे पत्रकार इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जगाला प्रेम अर्पावे हा संदेश देत – व्हॅलेंटाईन डे साजरा..
- Advertisement -