Tuesday, June 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ

MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ४० लाख रुपयांत देण्याचा दावा करणाऱ्या फोन कॉल्समुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या अफवांना पूर्णतः फेटाळून लावले असून, सर्व प्रश्नपत्रिका कडेकोट सुरक्षेत असल्याचे स्पष्ट केले आहे. (MPSC Exam)

---Advertisement---

फोन कॉलमधून लाखोंची मागणी (MPSC Paper Leak)

नागपूरमधील एका कन्सल्टन्सीकडून काही उमेदवारांना फोन करून, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विक्रीस असल्याचा दावा करण्यात आला होता. ४० लाख रुपये दिल्यास प्रश्नपत्रिका मिळेल, तसेच मुख्य परीक्षेच्या पेपरसाठीही मदत केली जाईल, असे या कॉलमध्ये सांगण्यात आले. उमेदवारांनी याबाबत आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रारी केल्यानंतर, MPSC ने पुणे पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

व्हायरल ऑडिओ कॉलमुळे खळबळ

---Advertisement---

हे कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने स्पर्धा परीक्षांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात अनेक विद्यार्थ्यांना असेच कॉल आल्याचा दावा करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याने विचारणा केल्यावर, “तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे, फक्त कोणालाही काही सांगू नका,” असे सांगितल्याचेही समोर आले आहे. (MPSC Paper Leak)

MPSC चे स्पष्टीकरण – परीक्षा ठरल्यावेळीच होणार

या प्रकारानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेत परीक्षार्थी उमेदवारांना अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले. MPSC च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले की, “आयोगाकडे सर्व प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित आहेत. कोणत्याही स्थितीत परीक्षा नियोजित वेळेनुसार २ फेब्रुवारी रोजीच होणार आहे. परीक्षार्थींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.”

पोलिसांची चौकशी सुरू

MPSC च्या तक्रारीनंतर पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. कोणत्याही परीक्षार्थींना अशा संशयास्पद फोन कॉल्स आल्यास secretary@mpsc.gov.in या ई-मेलवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा अफवांना बळी न पडता, आपला अभ्यास सुरू ठेवावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

whatsapp link
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हे ही वाचा :

संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

---Advertisement---

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles