Friday, April 19, 2024
Homeराजकारणगुलाम नबी आझाद यांनी केली आपल्या नव्या पक्षाची घोषणा, पहा काय आहे...

गुलाम नबी आझाद यांनी केली आपल्या नव्या पक्षाची घोषणा, पहा काय आहे नाव आणि रंग

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन पडलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनाम्या सोबतच आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली होती. आज आझाद यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली.

गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मूत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आझाद यांनी आपल्या पक्षाचं नाव ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे घोषित केलं आहे. आझाद यांनी आपल्या पक्षाचा झेंडा देखील पत्रकार परिषदेत फिरकवला. या झेंड्यामध्ये निळा, पांढरा आणि पिवळा असे तीन रंग आहेत. रविवारी गुलाम नबी आझाद हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मूमध्ये गेले आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नावं जाहीर केले आहे.

यावेळी आझाद म्हणाले, ‘आमचे राजकारण जात किंवा धर्मावर आधारित असणार नाही. आम्ही सर्व धर्म आणि राजकीय पक्षांचा आदर करू. मी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा नेत्यांवर वैयक्तिक हल्ले केले नाहीत. मी धोरणांवर टीका करतो. राजकीय नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करणे टाळले पाहिजे’.

आझाद यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे समाविष्ट आहे. नव्या पक्षाची विचारधारा त्यांच्या नावासारखी असेल आणि त्यात फक्त सर्व धर्मनिरपेक्ष लोकच सहभागी होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय