Ghodegaon : आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळावा यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने दि. ६ सप्टेंबर पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर बेमुदत उपोषण आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. याचे निवेदन सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.
दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी संघटनेने घोडेगाव प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनास प्रकल्प अधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या घटनेला महिना होत आलेला आहे. तसेच दि.२९ व ३० ऑगस्ट २०२४ रोजी संघटनेने नाशिक आयुक्त कार्यालय नाशिक च्या समोर देखील उलगुलान मोर्चा केला होता. या आंदोलनास देखील आयुक्त कार्यालयाने लेखी आश्वासन दिलेले आहे. तसेच सबंधित कार्यालयांना पत्राद्वारे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी निर्देश देखील दिलेले आहेत. तरी देखील रिक्त जागा असुन देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाहीत. यामुळे संघटनेच्या वतीने ६ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
यावेळी बेमुदत उपोषण आंदोलनाच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजया पंढूरे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य एसएफआय चे माजी राज्य समिती सदस्य राजू शेळके, पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष रोहिदास फलके आदि विद्यार्थी उपस्थित होते.
Ghodegaon
‘विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक वर्ष संपून परीक्षा सुरु झालेल्या आहेत. मात्र अद्यापही रिक्त जागा असूनही जबाबदार प्रकल्प कार्यालय विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वसतिगृहापासून वंचित ठेवत आहे. वसतिगृह प्रवेश न मिळाल्याने १० विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून शिक्षण सोडवे लागले आहे. आणि प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पीएम जनमन अभियानातून वेळ मिळत नाही ? याचा अर्थ असा होतो कि, हे आदिवासी विकास विभाग आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद करत आहे.’
– समीर गारे (सहसचिव, एसएफआय, पुणे जिल्हा)
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती