Tuesday, April 23, 2024
Homeआंबेगावघोडेगाव : शेतकरी प्रश्नांना घेऊन किसान सभेची निदर्शने

घोडेगाव : शेतकरी प्रश्नांना घेऊन किसान सभेची निदर्शने

शेतकरी प्रश्नांवर देशव्यापी आंदोलनाला पाठींबा

घोडेगाव : संपूर्ण देशभरात शेतीचे भयानक संकट निर्माण झालेले आहे. शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांची गळचेपी ही रोज होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेकडो शेतकरी संघटना एकत्रित येत, संयुक्त किसान मोर्चा हे देशपातळीवरील एक मजबूत शेतकरी संघटन निर्माण झालेले आहे. शेतमालाला दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा या देश पातळीवरील मागण्यांसाठी, दिनांक 26 जानेवारी, रोजी हरियाणामध्ये भव्य किसान महापंचायत आयोजित करून या आंदोलनाची सुरुवात होत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात, वरील देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील ओला दुष्काळ, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, वनाधिकार,

अपूर्ण कर्जमुक्ती, बाळहिरडा खरेदी, बाळहिरडा नुकसान भरपाई, यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी,

राज्यभर, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने, ट्रॅक्टर मार्च आयोजित केले गेले होते, असे किसान सभेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे म्हणाले. 

या देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून, किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने तहसील कार्यालय, घोडेगाव येथे निदर्शने करून मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ए.बी. गवारी यांना देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, आंबेगाव तालुका सचिव रामदास लोहकरे, आंबेगाव तालुका कार्यकारणी सदस्य दत्ता गिरंगे, अर्जुन काळे, सुभाष पारधी, ज्योती पारधी, रत्नाबाई पारधी इ.उपस्थित होते. डीवायएफआय संघटनेचे महेश गाडेकर यांनी ही या आंदोलनाला उपस्थित राहून पाठींबा दिला.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय