Thursday, March 28, 2024
Homeआंबेगावघोडेगाव : नवसाक्षर महिलांना साक्षरता प्रमाणपत्राचे वितरण

घोडेगाव : नवसाक्षर महिलांना साक्षरता प्रमाणपत्राचे वितरण

घोडेगाव : रोटरी क्लब ऑफ पुणे, मेट्रो यांच्या सहकार्याने व आदिम संस्था, आंबेगाव, यांच्या संयोजनातून समता साक्षरता वर्ग बराटे वस्ती, कर्वेनगर, पुणे येथे,मागील एक वर्षभर हा साक्षरता वर्ग सुरू होता. या साक्षरता वर्गात शिकणाऱ्या, महिलां दिवसभर काम करून, दुपारच्या वेळी साक्षरता वर्गात येऊन शिक्षण घेत असत. या साक्षरता वर्गात शिकणाऱ्या सर्व महिलांनी हे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

या साक्षरता वर्गाच्या माध्यमातून काही महिला या, मराठीबरोबरच, इंग्लिश भाषा ही वाचायला, लिहायला शिकल्या आहेत. नुकतीच या सर्व नवसाक्षर महिलांची एक मूलभूत साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत ज्या महिलांनी,यश संपादन केले त्या सर्वांना प्रमाणपत्र, वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी साक्षरता वर्गात स्वयंसेवक म्हणून अध्यापनाचे काम करणारी इंद्रायणी इंगळे यांचा सत्कार, रोटरी क्लबचे विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर शिक्षित झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी, नवसाक्षर महिलांनी त्यांचे अनुभव कथन केले. सुरुवातीला, अक्षरओळख पासून ते बसच्या पाट्या वाचायला शिकणे, घरात मुलांचा अभ्यास करून घेणे, अशा अनेक गोष्टी,आम्ही या साक्षरता वर्गातून शिकलो, असे यावेळी नवसाक्षर महिलांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सुपे यांनी केले तर साक्षरता वर्गाच्या स्वयंसेविका इंद्रायणी इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पुणे मेट्रोचे पदाधिकारी विवेक कुलकर्णी व मुकुंद चिपळूणकर, आदिम संस्थेचे अनिल सुपे इ. उपस्थित होते.

LIC life insurance corporation
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय