घोडेगाव (आंबेगाव) : असाणे, ता. आंबेगाव येथे आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने स्वाध्याय पुस्तिका व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले.
अख्या जगावर गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा वर्गात भरविणे बंद केल्या असून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. आदिवासी भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असतो त्यामुळे कधी-कधी लाईट जाते. मोबाईल ला रेंजचा प्रॉब्लेम येतो. ग्रामीण आदिवासी भागातील अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल ही उपलब्ध नाहीत मग आपल्या मुलांनी ऑनलाइन शिक्षण घ्यायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच असाणे गाव आणि त्या गावातील संपूर्ण वाड्या-वस्त्यांवरील जिल्हा परिषद, माध्यमिक, आणि आश्रम शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी इयत्तेपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांंचेे वाटप करण्यात आले.
अभ्यास करताना मुलांचा सराव व्हावा आणि त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने आदिवासी क्रांती संघटनेमार्फत स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्याचा विचार संघटनेने ग्रामस्थांपुढे मांडला त्यासाठी अनेक ग्रामस्थांनी संघटनेला सढळ हाताने मदत केली .