Thursday, March 28, 2024
HomeNewsजर्मन सॉफ्टवेअर SAP कंपनी 3000 कामगारांना घरी बसवणार

जर्मन सॉफ्टवेअर SAP कंपनी 3000 कामगारांना घरी बसवणार

बर्लिन: जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली असून एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.आता जर्मन सॉफ्टवेअर कंपनीने सॅप (SAP) त्यांच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याच्या निर्णय घेतला आहे.

कंपनीने टारगेटेड रिस्ट्रक्चरींग योजना तयार केल्याचे समजते.त्यामुळे कंपनीची 300 ते 350 दशलक्ष युरोची बचत होऊन कंपनीला संभाव्य मंदीचा सामना करणे शक्य होणार आहे.जगभरात कंपनीचे 1 लाख 20 हजार कर्मचारी आहेत.
SAP सॉफ्टवेअर प्रणाली जगातील मोठ्या व्यावसायिक कंपन्यांच्या उलाढाली व लॉजीस्टिक मध्ये वापरली जाते.भारतातील वाहन उद्योगात ही प्रणाली वापरली जाते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय