सांगली :- सन २०२०-२१ मध्ये राज्यातील गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम पशुसंवर्धन विभागामार्फत राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी ३० जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून आपल्याकडील जातीवंत व उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व म्हशींचे अर्ज भरून द्यावेत व त्यांची नोंदणी करून या योजनेत जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही धकाते यांनी केले आहे.