किनवट : रशियन क्रांतीचे प्रणेते कॉ.व्लादिमिर लेनिन यांच्या १०० व्या स्मृतिदिना निमित्ताने गोकुंदा किनवट येथील गोपी किशन मंगलकार्यालयात दि.२१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ६ यावेळेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पक्ष सर्वसाधारण सभेचे उदघाटन माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकप जिल्हा सेक्रेटरी कॉ.शंकर सिडाम हे होते.
जिल्हाभरातून शंभर पेक्षा अधिक प्रमुख कार्यकर्त्यांची या सर्वसाधारण सभेत उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.किशोर पवार यांनी केले. जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.अर्जुन आडे आणि कॉ.विनोद गोविंदवार यांनी वेगवेगळ्या दोन विषयावर मांडणी केली.
येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात किनवट येथे माकप पॉलिटब्युरो सदस्या कॉ. वृंदा करात आणि कॉ. डॉ.अशोक ढवळे यांच्या सभा घेण्यात येतील अशी माहिती कॉ.अर्जुन आडे यांनी आपल्या भाषणात दिली असून निम्न पैनगंगा प्रकल्प (चिमटा धरण) धरण विरोधी संघर्ष समिती पूर्णताकतीने कामाला लागली आहे.
ही पक्ष सभासदांची सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.प्रल्हाद चव्हाण, कॉ. स्टॅलिन आडे, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.अंकुश आंबूलगेकर, कॉ.मंजूश्री कबाडे, कॉ.शैलिया आडे, कॉ.जनार्धन काळे,कॉ.खंडेराव कानडे आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. उज्वला पडलवार यांनी केले. युनिट निहाय गट चर्चा होऊन निवडक प्रतिनिधीनी मत व्यक्त केले. धरण विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.बाबा डाखोरे, कॉ.आडेलू बोनगीर, पवन जंगडमवाड, कॉ. दिगांबर काळे यांनी गटाचे प्रतिनिधित्व केले व चर्चेत सहभाग नोंदविला. जिल्हा सेक्रेटरी कॉ.शंकर सिडाम यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. सर्वसाधारण सभा संपल्यानंतर रात्री उशिरा पर्यंत जिल्हा कमिटीची बैठक घेण्यात आली. एसएफआय विद्यार्थी संघटनेचे किनवट पूर्वीचे कार्यकर्ते तथा पक्षाचे हितचिंतक ऍड. मिलिंद सर्पे यांना देखील मंचावर निमंत्रित करण्यात आले होते. अशी माहिती नांदेड तालुका सचिव तथा जिल्हा कमिटी सदस्य कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.