Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणगांधी जयंती निमित्त सुरगाणा महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा

गांधी जयंती निमित्त सुरगाणा महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा

सुरगाणा ता. २ (दौलत चौधरी) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रभाकर चव्हाण यांनी प्रतिमा पूजन करून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्रिभुवन सर यांनी महात्मा गांधी विदयामंदिर संस्थेच्या वर्धापनाविषयी माहिती दिली. 

याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा व ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये माहेश्वरी चौधरी, रुपाली थोरात, कौशल्या देशमुख यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षेत देखील मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी आयोजक प्रा.भगवान भोये, प्रा.थविल प्रा.खंबाइत उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय