Sunday, December 8, 2024
Homeआंतरराष्ट्रीयGAZA : पॅलेस्टाईन नागरिकांना अभूतपूर्व मानवतावादी मदत, भारत रशियासह अनेक देशांची विमाने...

GAZA : पॅलेस्टाईन नागरिकांना अभूतपूर्व मानवतावादी मदत, भारत रशियासह अनेक देशांची विमाने इजिप्तला रवाना

गाझा : राफाह, गाझा – इजिप्त आणि गाझा मधील राफाह प्रवेशद्वार सीमा इस्राईलने खुली केल्यामुळे जागतिक मदत इजिप्त मधून पॅलेस्टाईन गाझा नागरिकांना मिळण्यास सुरूवात झाली आहे.

सतत 15 दिवसाच्या युद्धग्रस्त पॅलेस्टिनी प्रदेशात मोठ्या प्रमाणात मदतीचे अवजड ट्रक अन्नधान्य, औषधे, पाणी व निवारा तंबूसह पोचले आहेत. सध्या 20 मोठ्या ट्रॅक्सना परवानगी देण्यात आली आहे. 3,000 टन मदत वाहून नेणारे 200 हून अधिक ट्रक सीमेवर थांबले आहेत. गाझा मधील 20 लाख लोकांना वीज पुरवठा करण्यासाठी जनरेटर्सची व्यवस्था करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईन नागरिकांना मदतीची घोषणा केल्यानंतर भारतीय हवाई दलाची C-17 मालवाहू विमाने साडेसहा टन औषधे व 32 टन आपत्कालीन व्यवस्थापन मटेरियलची मदत घेऊन निघाली. रशियाच्या मोठ्या विमानाने 27 टन मदत पाठवली आहे.

तुर्की सह युरोपियन देश, गल्फ व जगभरातून मोठ्या प्रमाणात विमाने इजिप्त मध्ये उतरत आहेत. युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली ट्रक्स मधून ही मदत टप्प्या टप्प्याने गाझा शहरात जाणार आहे. इसरायल व इजिप्त यांच्यातील मध्यस्थमार्फत मदतीचे संचालन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय