Tuesday, June 18, 2024
Homeजुन्नरJunnar : गौरव कोकणे जुन्नर तालुक्यात बारावी कॉमर्स शाखेत प्रथम

Junnar : गौरव कोकणे जुन्नर तालुक्यात बारावी कॉमर्स शाखेत प्रथम

Junnar : एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा कु गौरव संदिप कोकणे हा विद्यार्थी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत जुन्नर तालुक्यात कॉमर्स शाखेत सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आला आहे. आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे या गावातून दररोज ५० किमी अंतर एसटीने प्रवास करून जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असे. (Junnar)

कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना लहानपणापासून सीए होण्याचे स्वप्न पाहणारा गौरव हा सुट्टीच्या दिवशी आई वडिलाना शेतीच्या कामात मदत करीत होता. तसेच जिद्दी व कष्टाच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीत ही गौरवने बारावी बोर्ड परीक्षेत वाणिज्य शाखेत ९४.१७% गुण प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल चिंचोली कोकणे ग्रामस्थ मंडळी यांनी गौरवचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

तसेच जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी कु गौरव कोकणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्यगुच्छ देऊन विशेष सत्कार करून अभिनंदन केले. तसेच सर्व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही बी कुलकर्णी, प्राचार्य डॉ एम बी वाघमारे, उपप्राचार्य डॉ आर.डी.चौधरी, उपप्राचार्या प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा. एस ए श्रीमंते आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद यांनी गौरव कोकणे याचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

एका शेतकऱ्याचा मुलगा कु गौरव संदिप कोकणे स्वतःच्या क्षमतेवर व महाविद्यालयातील विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बारावी बोर्ड परीक्षेत जुन्नर तालुक्यात कॉमर्स शाखेत सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने आम्हास विशेष आनंद असून त्याचा सार्थ अभिमान आहे.

– ॲड संजय शिवाजीराव काळे (अध्यक्ष जु ता शि शि प्र मंडळ जुन्नर)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय