माकपचे १५ वे जिल्हा अधिवेशन संपन्न
पिंपरी चिंचवड : भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १५ वे जिल्हा अधिवेशन औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेल्या पिंपरी चिंचवड शहरांमध्ये श्रमशक्ती भवन येथे अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात ज्येष्ठ कॉम्रेड वीरभद्र स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहन करून झाली.
यावेळी शेतकरी कामगार महिला एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमला. यावेळी माकपचे नेते कॉम्रेड उदय नारकर,कॉम्रेड किसन गुजर, कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड शुभा शमीम, कॉम्रेड किरण मोघे हे उपस्थित होते. शहीद स्तंभाला अभिवादन करून स्वागत पूर्व भाषण कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी केले.
यावेळी या औद्योगिक नगरीत होणाऱ्या पक्षाच्या जिल्हा अधिवेशना बद्दल गौरव उद्गार काढून जुने कॉम्रेड प्रभाकर मानकर कॉम्रेड उत्तम गायकवाड यांच्या लढ्याचा फलित म्हणून या नगरीत काम उभा राहिले व ते टिकून ठेवण्याचे काम नवीन पिढीने केले. त्यामुळेच आज पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे जिल्हा अधिवेशन पक्ष निश्चितपणे घेऊ शकला, असे प्रतिपादन उदय नारकर यांनी केले.
पुढे बोलताना नारकर यांनी देशासमोरील संकटे व धर्मांध आणि जातीय शक्तींचा वाढता प्रभाव व सी सी ए एन आर सी सारख्या कायद्याचे केंद्र सरकार करत असलेला गैर वापराबद्दल आपल्या भाषणात सडकून टीका केली.
तसेच काळे कायदे शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व लढ्यामुळे व शेतकऱ्यांच्या शहीद तत्त्वामुळे व सातशे शेतकऱ्यांच्या शहीदत्त्वामुळे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले हे केंद्र सरकारच्या तपश्चर्येमुळे नाही शेतकऱ्यांच्या बलिदानामुळे आलेलं यश आहे. भविष्यकाळात जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रस्थापित व व्यवस्थेविरोधात
आंदोलन व संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.
■ नवनिर्वाचित जिल्हा कमिटी पुढीलप्रमाणे :
अजित अभ्यंकर, शुभा शमीम, किरण मोघे, नाथा शिंगाडे, अपर्णा दराडे, सरस्वती भांदिर्गे, महारुद्र डाके, ज्ञानेश्वर मोटे, अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, सोमनाथ निर्मळ, डॉ. किशोर खिल्लारे, राजु घोडे, महेंद्र थोरात, गणपत घोडे, वसंत पवार वरील सदस्यांची निवड करून पुणे जिल्हा सेक्रेटरी म्हणून गणेश दराडे यांची एक मताने करण्यात आली.
या अधिवेशनाचा समारोप श्रमशक्ती भवन ते दत्तवाडी विठ्ठल मंदिरापर्यंत रॅली काढून महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. रॅलीमध्ये 200 महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.