गडचिरोली : जिल्ह्यात अनेक भागात नक्षलविरोधी अभियान गडचिरोली पोलीस नेहमी राबवित असतात. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा कुंदरी जंगल परिसरात पुरलेले दोन हजार रुपयांच्या नोटा असलेल्या सोळा लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत तसेच इतर काही साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नक्षलवाद्यांनी जंगलात पुरलेले १५ लाख ९६ हजार रुपये तसेच काही स्फोटक साहित्य पोलिसांनी केले जप्त आहे. नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद विरोधी सी ६० पथकांने ही मोठी कारवाई केली आहे. अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिसांनी काय काय जप्त केलं ?
१ जुलै रोजी पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेले १६ लाख रुपये, इलेक्ट्रिक बटन, एक स्वीच, तीन डेटोनेटर, दोन वायर बंडल, एक वॉकी टॉकी, नक्षल पॅम्पलेट बॅनर, आणि इतर साहित्य पोलिसांनी जमा केलं.