Tuesday, July 23, 2024
Homeग्रामीणलोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी वितरित

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी वितरित

कोल्हापूर : मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली होती. परंतु बंद अवस्थेत असलेले महामंडळ एक हजार कोटीचे भाग भांडवल देऊन ते परत चालू करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सुद्धा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आंदोलने निवेदन होते.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 1 लाख रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी करण्याची संधी, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुरोगामी संघर्ष परिषदेने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे महा विकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला म्हणजेच मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी एक हजार कोटीचे भागभांडवल दिल्यामुळे समाजाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने अभिनंदन करत असल्याचे कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष मुसा (भाई) मुल्ला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

प्रसिद्धीपत्रकात मुसा भाई यांनी पुढे म्हटले आहे की शासनाने मातंग समाजातील निस्वार्थी व समाजाप्रती तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांची अध्यक्षपदी निवड करावी व महामंडळाचा कारभार पारदर्शी ठेवून समाजाच्या पैशात भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद हे कदापि सहन करणार नाही.

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय