Friday, April 19, 2024
HomeNewsयेत्या १२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते...

येत्या १२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे आयोजन

मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर तर्फे आयोजन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर

मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याची माती,मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्तपणे येत्या १२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

           ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेच्या नियोजनासाठी मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरव येथील प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, सेंद्रीय कृषी शेतीतज्ज्ञ दिलीप देशमुख बारडकर, सुर्यकांत कुरुलकर, डॉ. प्रिती काळे, नितीन चिलवंत, जीवन बोराडे, बळीराम माळी, मुंजाजी भोजने, मच्छिंद्र चिंचोळे, वामन भरगंडे, प्रल्हाद लिपने, सुधाकर पऊळकर, दत्तात्रय धोंडगे, शंकर तांबे, आण्णासाहेब मोरे, प्रा. डॉ. प्रविण घटे, राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बैस आदी उपस्थित होते. 

         देशभक्तीचे स्फुल्लींग मनामनात जागवण्यासाठी व जन्मभूमीची नाळ घट्ट करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ (सिंदगी विजापूर-मराठवाडा- हैदराबाद) अशी ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा निघणार आहे. या यात्रेची संकल्पना नितीन चिलवंत यांची आहे. 

           अरुण पवार यावेळी म्हणाले, की आपली दातृत्वाची भूमिका ठेवून कर्नाटक-महाराष्ट्र-तेलंगणा या ठिकाणाहून जाणाऱ्या या यात्रेसाठी सहकार्य व पाठबळ देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. दिलीप देशमुख बारडकर म्हणाले, की मराठवाडा सेंद्रीय शेती विद्यापीठ व ट्रेनिंग सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ. प्रिती काळे यांनी मराठवाड्यातील महिला, युवती यांचे पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  

          ही यात्रा यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हयाची जबाबदारी उद्योजक प्रल्हाद लिपने, कामगार नेते मुंजाजी भोजने, प्रा. डॉ. प्रविण घटे यांनी, धाराशिव जिल्हयाची जबाबदारी प्रकाश इंगोले, अरुण पवार यांनी, लातूर जिल्हयाची जबाबदारी उद्योजक अण्णासाहेब मोरे यांनी, बीड जिल्ह्याची जबाबदारी उद्योजक शंकर तांबे यांनी, नांदेड जिल्हयाची जबाबदारी दिलीप देशमुख बारडकर यांनी, जालना जिल्हयाची जबाबदारी जीवन बोराडे यांनी, हिंगोली व संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याची जबाबदारी नितीन चिलवंत यांनी घेतली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय