Tuesday, April 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदिल्लीतील मजदूर किसान शेतमजूर संघर्ष रॅलीत शेकडो आशा वर्कर सहभागी होणार

दिल्लीतील मजदूर किसान शेतमजूर संघर्ष रॅलीत शेकडो आशा वर्कर सहभागी होणार

सिंधुदुर्ग : सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर युनियनच्या वतीने दिल्लीमध्ये 5 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या देशभरातील शेतकरी, कामगार व शेतमजूर संघर्ष यात्रेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दीडशे ते दोनशे आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहे, अशी माहिती युनियनच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाल्या, केंद्र सरकार देशभरातील सर्व कामगारांच्या विरोधात नवीन चार कामगार विरोधी कायदे लागू करत आहे, त्यामुळे कामगारांनी लढून मिळवलेले हक्क व अधिकार यांना तिलांजली मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालास स्वामीनाथन समितीने ठरवल्याप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान हमीभाव मिळालाच पाहिजे व शेतमजुरांना सुद्धा हक्काचे काम व कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. या व अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातील अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू व अखिल भारतीय शेतमजूर युनियन या संघटनांच्या वतीने संघर्ष यात्रा 5 एप्रिल 23 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे.

आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी या सर्व योजना कर्मचाऱ्यांना सरकारी नोकर म्हणून सेवेत कायम करून, त्यांना किमान वेतन कायद्यानुसार मासिक ₹26 हजार ते ₹28 हजार मिळालेच पाहिजेत, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होत आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजता कणकवलीतून सुटणाऱ्या मंगला एक्सप्रेस ने जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या आशा व गटप्रवर्तक निघणार आहेत… या रॅली द्वारे केंद्र सरकारला कामगार, कर्मचारी, शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असा आशावाद युनियनच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय