Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयऑनलाईन पेमेंट करताना 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क भरावे लागणार...

ऑनलाईन पेमेंट करताना 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क भरावे लागणार ?

नवी दिल्ली : देशभरात ऑनलाईन पेमेंन्टचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अशात 1 एप्रिलपासून UPI द्वारे पेमेंट महाग होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आले आहे, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही दावा केला जात आहे की, 1 एप्रिलपासून 2000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर 1.1 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहार करताना खात्यातून खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार नाही, UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच ग्राहकांसाठी मोफत असतील तसेच इंटरचेंज चार्ज फक्त PPI व्यापारी व्यवहारांवर लागू होईल असे NPCI ने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 1 एप्रिलपासून 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क भरावे लागेल, असे म्हटले होते. त्यानंतर यूजर्सना मोठा धक्का बसला कारण डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा सर्वात मोठा वाटा आहे.

UPI द्वारे दर महिन्याला सुमारे 8 अब्ज व्यवहार होतात असे ट्विट करून NPCI ने ग्राहकांची चिंता दूर केली आहे. याचा फायदा किरकोळ ग्राहकांना मिळत आहे. ही सुविधा मोफत सुरू राहील आणि खाते ते खाते व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच Phonepe, Paytm, Google pay वरून UPI पेमेंट पूर्वीप्रमाणेच मोफत राहील, असे NPCI स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय