मावळ : ऐतिहासिक धम्माभूमीच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर “ए. सी. एम. ए. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ. आय, अखिल भारतीय किसान सभा, भीम सेवा मित्र मंडळ जांभवडेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मावळ पंचायत समितीच्या सभापती
ज्योती शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सेक्रेटरी गणेश दराडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून, शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष अपर्णा दराडे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंदे, मंगेश भोसले, ननोली च्या सरपंच मोनिका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब शिंदे, सागर शिंदे, नामदेव सूर्यवंशी, शरद शिंदे, सचिन ओहाळ केले होते.