Friday, April 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक लोकांना विविध साधनांचे मोफत वाटप

जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक लोकांना विविध साधनांचे मोफत वाटप

जुन्नर : आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी20 23रोजी जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना संपर्क संस्था मळवली भाजे, रूचिका क्लब मुंबई व भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या वतीने दिव्यांग लोकांना मोफत साहित्य वाटप पुर्व नाव नोदणी व तपासणी करून मोफत साहित्य आज शुक्रवार पेठ कालिका माता मंदिर येथे जुन्नर मधील श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष व प्रहार रूग्ण सेवक श्री दिपक चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना 5 तीन चाकी सायकल, 12 व्हील चेअर व 40 श्रवणयंत्र ( कानाची मशीन) काठी कुबडया, वाॅकर चे वाटप करण्यात आले.

यावेळी रूचिका क्लब मुंबई व संम्पर्क संस्था, भगवान महावीर विकलांग सहायता समिती चे विश्वस्त श्री किरण आर्या, अमित कुमार बॅनर्जी, डाॅ. सचिन गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग, भगवान महावीर विकलांग सहायता समिती चे नारायण व्यास, जुन्नर तालुका दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक तसेच शालेय विद्यार्थ्यांना कानाची मशीन (श्रवणयंत्र) वाटप करण्यात आले.

कार्यक्रम चे अध्यक्ष अविनाश कर्डिले याच्या व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते लाभार्थी ना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे अरूण शेरकर अध्यक्ष, दत्तात्रय हिवरेकर गुरूजी कार्याध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, सुनिल जंगम, अहमद रफीक शेख पत्रकार, संदिप घोणे, श्रीकांत जाधव राज फाउंडेशन चे संस्थापक, सौरभ मातेले, नरसिंग कलोसिया, याकुब खान, हरी नायकोडी, जालिंदर ढोमसे, सूर्यकांत जाधव, गणेश शेटे, सचिन वाव्हळ, चंद्रकांत जाधव ,सचिन घोगरे, विशेष सहकार्य HR शिवाजी मोहीते, योगेंद्र कुलकर्णी, सतीश माळी, मनोज रोकडे, विशेष शिक्षक श्रीमती संगीता भुजबळ, विशेष तज्ञ संंगिता डोंगरे, रोहिणी गडदे, सिमा मोरे, मुंढे जयश्री, विशेष शिक्षक समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती जुन्नर, ज्ञानेश्वर हासे, सुनिल खैरे, गणपत उगले, एकनाथ लोखंडे, सुर्यभान थोरात, मंदाकीनी मंडलिक, (नासिक विभाग) व दिव्यांग व जेष्ठ नागरीक विद्यार्थी व पालक उपस्थित होतेे.

यावेळी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी लवकर पुन्हा पुढील महिन्यात जुन्नर तालुक्यातील व परिसरातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या करीता गरजू लोकांपर्यंत माहिती दयावी व नाव नोदणी करून घ्यावी म्हणून आवाहन केले. यावेळी कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर गुरूजी यांनी उपस्थित मान्यवरांचे व दिव्यांग बांधव उपस्थितांचे आभार धन्यवाद मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय