Madhukar Pichad : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ असलेल्या पिचड यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 15 ऑक्टोबर रोजी राजूर येथील राहत्या घरी असताना पहाटे ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मधुकर पिचड यांच्या निधनाने त्यांच्या चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Madhukar Pichad यांची राजकीय कारकीर्द
मधुकर पिचड यांनी 1980 ते 2009 पर्यंत नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. शरद पवार यांचे खंदे सहकारी म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, 2019 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी सहकार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यांनी अमृतसागर दूध सहकारी संस्था आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात योगदान दिले.
मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी महादेव कोळी आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी शिक्षक म्हणून काम केले, तर पिचड यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एलएलबी पदवी मिळवली. विद्यार्थी जीवनातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
हे ही वाचा :
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती