पंजाब : सध्या पंजाब निवडणुका तोंडावर आल्या आहेत या निमित्ताने मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.मनमोहन सिंह यांनी म्हटलं की, भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज देशाची स्थिती अशी आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अजून गरीब होत चालले आहेत. कोरोना काळात केंद्राच्या वाईट धोरणांमुळं लोक आर्थिक समस्या, बेरोजगारी, वाढत्या महागाईनं त्रस्त आहे. साडेसात वर्ष सरकार चालवल्यानंतरही भाजप सरकार आपल्या चुका मान्य करायला तयार नाही. भाजप सरकार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार ठरवत आहे.
देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं
पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह:
सरकार को ये भी समझ लेना चाहिए की अपनी सूरत बदल लेने से सीरत नहीं बदलती, जो भी सच है वो हमेशा किसी ना किसी रूप में सामने आ ही जाता है!
बड़ी-बड़ी बातें करना आसन होता है लेकिन उनको अमली जमा पहनाना बहुत मुश्किल होता है। pic.twitter.com/LZOkm9ozKE
— INC TV (@INC_Television) February 17, 2022
राज्यात पुन्हा बर्ड फ्ल्यूमुळे खळबळ, ३०० कोंबड्या दगावल्या
माजी पंतप्रधान सिंग म्हणाले, “या सरकारचा खोटा राष्ट्रवाद जितका पोकळ आहे तितकाच धोकादायक आहे. त्यांचा राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
एक संदेश जारी करताना मनमोहन सिंग म्हणाले की, मला वाटते पंतप्रधानपदाला विशेष महत्त्व आहे. इतिहासाला दोष देण्यापेक्षा पंतप्रधानांनी सन्मान राखावा. मी 10 वर्षे पंतप्रधान असताना माझ्या कामातून बोललो. जगासमोर देशाची प्रतिष्ठा मी कधीही ढळू दिली नाही. भारताचा अभिमान मी कधीच कमी केला नाही. माझ्यावर कमकुवत, शांत आणि भ्रष्ट असल्याच्या खोट्या आरोपांनंतर भाजप आणि त्यांची बी आणि सी टीम देशासमोर उघड होत आहे, याचे मला निदान समाधान आहे.
RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!
दहावीचे ऑनलाइन हॉल तिकीट आजपासून मिळवा, वेळापत्रक पहा एका क्लिकवर !